नुकतेच जूनमध्ये उन्हाळयाच्या सुट्ट्या संपून शाळा सुरु झाल्या. यांनतर लगेच जुलैमध्ये विद्यार्थ्यांना अनेक सुट्ट्या मिळणार आहेत. जुलै महिन्यात शाळांना चार दिवसांची साप्ताहिक सुट्टी असणार आहेच.
शिवाय, काही ठिकाणी रविवारसोबतच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असतात. अधिकृतपणे पाहिले तर चार रविवारसह आणखी एक दिवस सुट्टी असणार आहे. तसेच, बुधवारी 17 जुलैला मोहरम निमित्त संपूर्ण भारतभर शाळा बंद राहणार आहेत.
जुलै महिन्यात अशा असणार सुट्ट्या
7 जुलैला पहिल्या रविवारी शाळा बंद असणार आहेत. 13 जुलैला पहिला शनिवार आणि 14 जुलैला दुसरा रविवार म्हणून शाळा बंद राहणार आहेत. तसेच, 17 जुलैला मोहरम निमित्त शाळांना सुट्टी असणार आहे.
तर 21 जुलैला तिसरा रविवार, आणि 27 जुलै व 28 जुलै रोजी चौथा शनिवार, चौथा रविवार म्हणून शाळांना सुट्टी असणार आहे. पण यंदा मोठा विकेंड मिळणार नाही. कारण या महिन्यात शनिवार – रविवारला लागून जास्त सरकारी सुट्ट्या नाहीत.
असे असले तरीही, 15, 16 जुलैला सुट्टी घेतली तर तुम्हाला 13 जुलै ते 17 जुलै अशी पाच दिवसांची मोठी रजा मिळू शकते. यावेळी तुम्ही पावसाळ्याचा मनमुराद आनंद लुटू शकता.