हातकणंगले, दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून कुंभार गटाचे कार्यकर्ते सक्रीय झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीने लढवणार असल्याने कुंभार गटाच्या समर्थकांनी कामाला लागावे, असे आवाहन रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या व पंचगंगा कारखान्याच्या मा. चेअरमन रजनीताई मगदूम यांनी केले आहे.
हातकणंगले, शिरोळ, कागल व कर्नाटकातील कुंभार गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सुतगिरणी येथे करण्यात आले होते.यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस आ. डॉ. अशोकराव माने, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. डॉ. अशोकराव माने म्हणाले, आण्णांनी आपल्या हयातीत समाजहितासाठी एखादी मागासवर्गीय सुतगिरणी सुरु करावी अशी कल्पना सुचली होती. त्यावेळी मी स्वतः अण्णांच्या नावे सुतगिरणी सुरु करावी, असा प्रस्ताव ठेवला होता. पण अण्णांनी तो प्रस्ताव नाकारुन शिरोळ तालुका मागासवर्गीय सुतगिरणी सुरु करावी, असा ठाम निर्धार केला आणि सुरु केली. त्यांच्या निधनानंतर सुतगिरणीला दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय हे नाव देऊन त्यांचे स्वप्न साकार केले. यावेळी कबनूरचे अशोक पाटील यांनी, पंचगंगा निवडणुकीतील काही मुद्दे स्पष्ट केले. त्यामध्ये सभासदांचा ऊस नेला नसल्याचा, साखर कमी करण्यातआल्याचा, वारस नोंदणीचा मुद्दा नोंदवला. तसेच हातकणंगले, शिरोळ तालुका, कागल, कर्नाटकमध्ये कृती समिती नेमून या तीन मुद्द्यांना सभासदांपर्यंत पोहचवण्याचा निर्धार केला. यावेळी महादेवराव धनवडे, महादेव कुंभार, बाळासो कुंभार, रायगोंडा पाटील, शामराव कांबळे, दिलीप शेलार, बडेसाब इनामदार, राजेंद्र माने, आण्णासोमळवाडे, महावीर पाटील, सदाशिव कदम, अविनाश पाटील, पंडीत खाडे, संतोष आवटी, सुकुमार गडगे यांच्यासह दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार प्रेमी उपस्थित होते. आण्णासाहेब शहापूरे, यांनी आभार मानले.
कुंभार गट आगामी निवडणुका ताकदीने लढवणार
