लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार आहे. अनेक नेते मंडळींचे जोरदार तयारी सुरू आहे. कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी कोणत्या पक्षाकडून मिळणार याची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुकीत जयवंतरावंच्या बालेकिल्ल्यात तुतारीला यश आले तर महाविकास आघाडीतील मशालीला धक्का बसला तरी देखील राज्यामध्ये तुतारीला मिळालेल्या यशामुळे राज्याचे नेतृत्व आमदार जयंत पाटील यांच्याकडेच जाण्याचे संकेत हे समर्थकांकडून बोलले जात आहेत.
आगामी विधानसभेला जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्याने तुतारी गरजणार असल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाकडून केला जात आहे. राज्यातील महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांची सत्ता आहे. उद्धव ठाकरे, जयंत पाटील, नाना पटवले या तिघांच्या हाती सरकार येणार असल्याचा दावा विधानसभा निवडणुकी अगोदरच केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत तुतारीला मिळालेल्या यशाचे श्रेय हे जयंत पाटील यांनाच जात असल्याने त्यांच्याच बालेकिल्लात विजय महोत्सवाच्या पोस्टर वरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने इस्लामपूर – शिराळा मतदारसंघात नव्याने तुतारी गरजणार आहे.