हातकणंगले, लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या नांदणी मठाची हत्ती माधुरीला पेटा संस्थेने नेल्याच्या निषेधार्थ आळते (ता. हातकणंगले) येथे समस्त जैन समाजाच्या वतीने गावातून मुक मोर्चा काढला. यामध्ये महिला पुरुषा सह युवक – युवतीही मोठ्या संस्थेने सहभागी झाल्या होत्या. या मोर्चास गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार दिवस भर बंद ठेऊन पाठिंबा दिला.
गावातून मुक मोर्चा काढून गावचावडी समोर सर्व मोर्चेकरी एकत्रीत आले. याठिकाणी प्रविण जनगोंडा, जावेद मुजावर,बाळगोंडा पाटील सुभाष करके, शिरीष थोरात, अशोक आळतेकर, पुंडलिक बिरंजे, धनंजय टारे, भारती पाटील, आदिंनी तीव्र शब्दात निषेध नोंदवून पेटा संस्थेसह व आंबानी यांचा धिक्कार केला. कोणत्याही परिस्थितीत माधुरी हत्तीला परत आणणारच. सर्वांनी पाठीशी राहावावे असे आवाहन केले.
