मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का; मराठा आरक्षणासाठी खासदारांनी दिला राजीनामा

एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी एक पत्र लिहून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांचं हे राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाटील यांचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

हेमंत पाटील यांनी पत्रात काय लिहिलं?

हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देताना पत्रात लिहिलं आहे की, ”महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशयतिव्र असून, मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकन्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा असून, आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.”