आज व उद्या या दोन्ही दिवस सकाळी १० ते ५ या वेळेत विटा तहसील कार्यालयात उपस्थित राहून आपली कुणबी नोंद करून घ्यावी. यासाठी लागणारे कागदपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, ९३/९४ चा उतारा इत्यादी घेऊन तहसील कार्यालयात यावे. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी मोजणी ऑफिस मधील अधिकारी नगर परिषदेचे अधिकारी व या नोंदी कामी असणारे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कुणबी नोंद करण्यासाठी अत्यंत सुलभ आणि सुरक्षित असणार आहे या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन सकल मराठा समाजाने आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्वल करावे अशी सादही मोहिते यांनी मराठा समाजाला घातली.
यावेळी मोहिते यांनी आपल्या भागातील मराठा बांधवांना मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठा हुतात्म्यांची आठवण करून देत कळकळीचे आवाहन केले आहे. खानापूर तालुक्यात जवळपास ११४८५ इतक्या कुणबी नोंदी सापडल्या असून एकूण ६० ते ७० हजार कुटुंबीयांना या कुणबी नोंदीचा लाभ होणार आहे तरी सकल मराठा समाजाने त्वरित उपलब्ध असणारी कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात वेळेत यावे असे मोहिते यांनी सांगितले तसेच कुणबी दाखला मिळाल्याने शिष्यवृत्ती आरक्षण स्पर्धा परीक्षा शुल्कात सवलत आणि केंद्र व राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळण्याची दारी खुली होणार आहेत.
याशिवाय सरकारी नोकऱ्यांमध्ये असणारी कर्ज सवलती ओबीसी बिल महामंडळाच्या योजनेचा लाभ होणार आहे विविध विकास योजनांमध्येही या कुणबी दाखल्याने सहभागी होता येणार आहे.