सांगोला तालुक्यातील मंदिरांच्या विकासासाठी चार कोटी 39 लाखांचा निधी मंजूर!

सांगोला तालुका हा दुष्काळ भाग म्हणून जगजाहीर आहेच. सांगोला तालुक्यात दीपकआबा आणि शहाजी बापूंच्या पाठपुराव्याला अखेरीस यश आलेल आहे. म्हणजे सांगोला तालुक्यातील हजारो भाविक भक्तांचे आराध्य दैवत असणारे जवळा येथील श्री नारायणदेव, कडलास येथील श्री सोमनाथदेव आणि अकोला येथील श्री सिद्धनाथ या तिन्ही मंदिरांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात ब वर्गात समावेश झाला असून या मंदिराच्या विकासासाठी तब्बल चार कोटी 39 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.