किरकोळ झालेल्या भांडणाच्या रोशातून चिडून तिघांनी मिळून कोयतासारख्या मोठ्या धारदार हत्याराने डोक्यात, मानेवर, छातीवर, हातावर, पोटावर गंभीर वार करून 32 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला आहे. ही घटना गुरुवार दिनांक 11 रोजी रात्री दहाच्या सुमारास महूद तालुका सांगोला येथील साठे नगर समाज मंदिरजवळ घडली.
सुनील अनिल कांबळे वय वर्ष 32 राहणार महुद साठेनगर तालुका सांगोला चुकून झालेला तरुणाच नाव आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी तातडीने संशयतांना ताब्यात घेतले दरम्यान सुनील कांबळे खून प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी आणावं पुण्यातील मास्टर माइंडला शोधून काढावे या मागणीसाठी मृतांच्या संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थांनी आक्रोश करीत महूद दिघंची रोडवरील साठेनगर जवळ दीड तास रास्ता रोको केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता.
सुनील कांबळे खून प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही दोशींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आला.