गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अजून काही मूहुर्त मिळालेला नाहीये. यातच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे 13 तारखेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यात आहे.
अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, मात्र पुन्हा एकदा मंत्रिमंडळचा विस्तार लांबणीवर पडला. दरम्यान आता येत्या 13 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जातं आहे.
येत्या 13 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 कॅबिनेट, दोन राज्यमंत्री पद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान विधानपरिषदेच्या सभापती पदासीठीही अजित पवार गटाकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेच्या सभापतीसाठी राष्ट्रवादीचे नेते रामराजे इच्छूक असून एक राज्यमंत्रिपद कमी घेऊन सभापती पद मिळावं अशी अजित पवार गटाची मागणी असल्याची माहिती समोर येत आहे.विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास पक्षातील नेत्यांना बळ मिळेल. जनतेची कामे करता येतील यासाठी हा मंत्रिमंडळाचा विस्तार महत्त्वाचा ठरणार आहे. महायुतीच्या घटक पक्षातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत, अशा स्थितीमध्ये आता मंत्रिपद कोणाला मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.