बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर येते आहे. अक्षय कुमारला करोनाची लागण झाली आहे. तो कोविड १९ पॉसिटीव्ह झाला आहे. गेले अनेक दिवस तो ‘सरफिरा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता.
आज १२ जुलै रोजी त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र आज सकाळीच त्याला करोनाचं निदान झालं आहे. गेले दोन दिवस अभिनेत्याची प्रकृती बिघडली होती. अखेर त्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अक्षय आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात उपस्थित राहू शकणार नसल्याचं वृत्त आहे.इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमार गेले दोन दिवस आजारी होता. तरीही तो सतत ‘सरफिरा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता.
मात्र तब्येत बारी नसल्याने त्याने काही टेस्ट करून घेतल्या आणि त्या टेस्टमध्ये तो करोना पॉसिटीव्ह असल्याचं निदान झालं. अभिनेत्याने स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. तो एका वेगळ्या ठिकाणी इतरांपासून दूर राहत आहे. ती डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहे आणि सावधानता बाळगत आहे.
अक्षयबद्दलच्या या बातमीने चाहते मात्र काळजीत पडले आहेत. अक्षय १२ जुलै रोजी अंबानींच्या लग्नात हजेरी लावणार होता मात्र आता करोना झाल्यानंतर तो राधिका आणि अनंत यांच्या लग्नात जाऊ शकणार नाहीये. यापूर्वी तो अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या प्रेवेडींग फंक्शनमध्ये सहभागी झाला होता. त्याने पहाटे ३ पर्यंत डान्सदेखील केला होता. त्याने या कार्यक्रमाला चार चांद लावले होते.
आता मात्र तो या शाही सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीये. अक्षयबद्दलच्या या बातमीने चाहत्यांनाही धक्का बसला आहे.आज १२ जुलै रोजी त्याचा ‘सरफिरा’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. अक्षयही या चित्रपटासाठी खूप उत्सुक होता. मात्र आता पुढील काही दिवस त्याला क्वारंटाइनमध्ये काढावे लागणार आहेत.