दिपकआबांचा गावभेट दौऱ्यात नागरिकांशी दिलखुलास संवाद

🤗राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा सध्या जनसंवाद आणि गावभेट दौरा सुरू आहे. त्यांच्या या गावभेट दौऱ्याला सर्वसामान्य नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद देखील भेटत आहे. ग्रामीण भागात खेडोपाडी राहणाऱ्या नागरिकांना दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणी या गावभेट व जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने दिपकआबांनी सोडविलेल्या आहेत.

त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अनेक महिलांच्या देखील त्यांनी समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावलेल्या आहेत. वाड्यावस्त्यांवरील हजारो नागरिकांशी माजी आमदार दिपकआबांनी दिलखुलास संवाद साधला.