ऐन पावसाळ्यात कोल्हापुरात किल्ले विशाळगडाच्या अतिक्रमणावरून वातावरण तणावपूर्ण बनले आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर हिंदुत्वाची संघटनेने शंका उपस्थित केली आहे.किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास सरकार दिरंगाई करत असल्याच्या कारणावरून राज्यातील गडप्रेमी आणि स्वतः संभाजी राजे छत्रपती रविवारी किल्ले विशाळगडाकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.चार दिवसांपूर्वी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेने संभाजी राजे छत्रपती यांच्या भूमिकेवर निशाणा साधत अतिक्रमण हटवण्याचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, रविवारी संभाजी राजे हे राज्यभरातील गडप्रेमी आणि शिवप्रेमी कार्यकर्त्यांना घेऊन किल्ले विशाळगडासाठी रवाना होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घेत प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. किल्ले विशाळगडावर देखील तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 15 ते 29 जुलै या कालावधीत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अतिक्रमणावरून सर्व संघटना आक्रमक झाल्यानंतर सणासुदीच्या काळात प्रशासनाकडून खबरदारी म्हणून हा आदेश लागू करण्यात आला आहे.