इचलकरंजीत भारतीय जनता पार्टीचा बैठक…

इचलकरंजी आगामी विधानसभा निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे. निवडणुक कमळ चिन्हावर लढवली जाणार असून त्यादृष्टीने तळागाळातील लोकांच्यापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवाव्यात. इचलकरंजीचा आमदार व महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता लोकांपर्यंत पोहोचावे असे आवाहन करताना माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी निवडणुकीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल, असा सूचक इशारा दिला.

भाजपा इचलकरंजी शहर कार्यालय येथे प्रदेश कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक आयोजित मार्गदर्शन करताना हाळवणकर करण्यात आली होती. त्याप्रसंगी बोलत होते. ते म्हणाले, राज्य शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांची माहिती आपल्या बुथमधील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवून आपल्या बूथमधील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून द्यावा.

या बैठकीमध्ये बूथ रचनात्मक भाजप कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सुरेश हाळवणकर, शेजारी इतर मान्यवर काम, पक्षीय संघटनात्मक कामकाज, नवमतदार नोंदणी अभियान, नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातील विविध योजना, शासनाने घेतलेले निर्णय बाबत अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पश्चिम राहुल देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, इचलकरंजी शहराध्यक्ष पै.अमृत भोसले, मिश्रीलाल जाजू, धोंडीराम जावळे तसेच सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख शहर कार्यकारिणी पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला मोर्चा, युवा मोर्चा, विविध आघाडीचे प्रमुख, तसेच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.