भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड आणि रत्नागिरी या समुद्र किनाऱ्यालगतच्या असेलेल्या जिल्यांमध्ये आज १४ जुलै रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये आज डोंगराळ भागात अति मुसळधार तर मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील अन्य भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यातही घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. भोर, वेल्हा भागात १०० मिलिमीटरच्या वर पाऊस झाला आहे. तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात २०० मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे.
Related Posts
कोल्हापुरात मुसळधार पाऊस; शियेत ढगफुटीसदृश
कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला बुधवारी मुसळधार पाऊस पडला. शिये येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. काही वेळातच गावात सगळीकडे पाणीचपाणी झाले. सायंकाळपासून जिल्ह्याच्या…
चौदा तोळे दागिने चोरणाऱ्या महिलेस इचलकरंजीतून अटक
मध्यवर्ती बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या महिलेस आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इचलकरंजीतून अटक केली.या…
कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट किती? केव्हा सुटणार
कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात एक मोठं अपडेट समोर आलंय. कोल्हापूर-पुणे वंदे भारत सोमवारपासून सुरू होणार आहे. आठवड्यातून तीन वेळा धावणाऱ्या…