भर पावसात पुन्हा महूद येथील खून प्रकरणातील नातेवाईकांनी केला रस्ता रोको!

किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाच्या रोशातून चिडून कोयत्यासारख्या मोठ्या धारदार हत्यारांनी गंभीर वार करून 32 वर्षीय तरुणाचा महूद तालुका सांगोला येथे खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली होती. सदर घटनेतील सूत्रधार व आरोपी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी विविध संघटना आणि समाज यांच्याकडून होत असताना समाज बांधवांकडून रविवारी रस्ता रोको केला गेला.

खून प्रकरणातील आरोपींचे मोबाईलद्वारे सोशल मीडियावर स्टेटस ठेवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. खुणाच्या प्रकरणातील फिर्यादी म्हणून प्रथम मयत पत्नीचे नाव घ्यावे व आरोपींना कठोर शिक्षा मिळावी या मागणीसाठी समाज बांधवांकडून काल रविवारी भर पावसामध्ये पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान पोलीस निरीक्षक भीमराव खनदाळे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

परंतु दिलेल्या मुदतीत जर आरोपी व त्यामागील सूत्रधार यांना जेरबंद करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा यापुढे रस्ता रोको केल्यास आरोपी आणि त्यामागील सूत्रधार यांना अटक होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला.