कार्यालयात ड्युटीवर असताना तोंडात गुटका, सुपारीचा तोबरा भरणाऱ्या कर्मचाऱ्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पाच हजाराचा दंड करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.
सीईओ यांनी पदभार घेतल्यापासून आव्हाळे यांनी अचानकपणे दुपारी बांधकाम कार्यालयाला भेट दिली.कार्यालयातील स्वच्छता व कर्मचारी कसे बसतात याची पाहणी केली.
यावेळी एका कर्मचाऱ्यांच्या तोंडात गुटक्याचा तोबरा दिसला. त्यांनी तात्काळ त्या कर्मचाऱ्यांची कान उघाडणी केली.कार्यालयीन कामकाजावेळेस अस्वच्छता करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्या कर्मचाऱ्यास पाच हजाराचा दंड करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.
त्यानंतर कार्यालयात असलेल्या पाण्याच्या बाटल्यांचीही त्यांनी तपासणी केली.कार्यालयीन परिसरात पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर जरब बसली पाहिजे, अशी अॅक्शन घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. कार्यालयीन परिसरात सीसी टीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे. यामुळे प्रशासन जि. प. कर्मचाऱ्यांबरोबर कामानिमित्त येणाऱ्या गुटखा खाऊ नागरिकांनाही दंड करू शकते