आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते यशोदा पुलाच्या ठिकाणी स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ!

इचलकरंजीत यशोदा फुलाच्या ठिकाणी पूर्ववत कमान पूल बांधण्यात यावी अशी मागणी सातत्याने नागरिकांमधून केली जात होती. या संदर्भात आमदारा आवाडे यांच्याकडेही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आमदार आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करताना 2019 व 2021सली महापुरामुळे निर्माण झालेली परिस्थितीची शासन दरबारी माहिती देत पुलाची गरज पटवून दिली होती.

त्यानुसार राज्य शासनाने जुलै 2022 च्या अर्थसंकल्पामध्ये यशोदा पूल येथे बॉक्ससेल बांधण्यासाठी तसेच नदीवेस नाका ते पंचगंगा नदी रस्ता कॉक्रिटीकरनासाठी निधी मंजूर केला आहे. महापुरामुळे सातत्याने निर्माण होणारी पूर परिस्थिती दूर होण्यासाठी इचलकरंजी येथील पंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.