सुळकूड पाणी योजना कार्यान्वित करावी : आमदार राहुल आवाडे

राज्य शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड- दूधगंगा पाणीपुरवठा योजनेची इचलकरंजी शहराला गरज असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरू करावी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्दयावर बोलताना केली. शहरासाठी शासनाने अमृत २.० अंतर्गत १६०.८४ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. परंतु दूधगंगा काठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे योजनेचे काम रखडले आहे. शहराला स्वच्छ व मुबलक पाण्याची गरज असल्याने ही योजना कार्यान्वित करण्याची मागणी सातत्याने होत आहे तरीही त्याची पूर्तता होत नसल्याने आमदार आवाडे यांनी अधिवेशनात आवाज उठविला. शहराच्या पाण्याची गरज वाढली असून, मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून ही योजना मार्गी लावावी. अशी मागणी केली.