सांगोला विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी काल सोमवारी दिनांक 28 रोजी एकूण 20 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर 9 उमेदवारांनी 13 अर्जाची खरेदी केली आहे. सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी काल सोमवार अखेर 25 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी दिल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी सांगितले आहे. फटाक्यांची आतिषबाजी करत,भव्य दिव्य रॅली काढत, पदयात्रा व मोठे शक्ती प्रदर्शन करून सोमवारी मोठ्या चुरशीने विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
यामध्ये आम. शहाजीबापू राजाराम पाटील यांनी 2 अर्ज शिवसेना शिंदे गटातून भरले आहेत. तर मा. आम. दीपकआबा बापूसाहेब साळुंखे पाटील यांनी 1 अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून तसेच 2 अपक्ष अर्ज भरले आहेत. डॉ. बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांनी 2 अर्ज शेकाप मधून तर डॉ.अनिकेत चंद्रकांत देशमुख यांनी 1अर्ज शेकाप मधून तसेच 1 अर्ज अपक्ष म्हणून भरला आहे. यासह माजी जि.प. सदस्य अतुल प्रभाकर पवार यांनी अपक्ष, रेखाबाई शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना शिंदे गट, धरती अतुल पवार अपक्ष,
संजय वसंत पाटील जैनवाडी अपक्ष, किरण तानाजी साठे अकलूज अपक्ष, हरिश्चंद्र विठोबा चौगुले बामणी अपक्ष, मोहन विष्णू राऊत सांगोला अपक्ष, एकनाथ हनुमंत शेंबडे कमलापूर अपक्ष, डॉ. सुदर्शन मुरलीधर घेरडी किडबीसरी अपक्ष, रणसिंह विठ्ठल देशमुख अचकदाणी अपक्ष, धनाजी दत्तात्रेय पारेकर चोपडी स्वराज्य निर्माण सेना असे एकूण 20 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी आज मंगळवार अखेरचा दिवस असून या दिवशी ही विक्रमी अर्ज भरले जातील असा अंदाज आहे परंतु, 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत असून या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.