राज्यातील सर्व जिल्हयांत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी केली जात आहे. यानुसार आयुष्यमान भव योजने अंतर्गत आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सकाळ सत्र नववी ते बारावी व दुपार सत्र पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभीषण माने उपस्थित होते. सांगोला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. देवदत्त पवार, डॉ. प्रथमेश लोहकरे, डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. संदीप शेंडगे, डॉ. असिफ सय्यद, डॉ. विद्युला बाड, डॉ. सुषमा फाटे, डॉ. निकत इबुशे, आरोग्य सेविका जयश्री जगदाळे, रेश्मा वाघमारे, सुधा गायकवाड, अश्विनी काशीद, सिंधु सरगर व औषध निर्माता समाधान शिवशरण, नाझिया मुजावर, अमृता रसाळ, अण्णासाहेब कांबळे, जगदीश पाडवी या पथकाद्वारे विदयार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सदर पथकांना मुलांची तपासणी करण्यासाठी आवश्यक ती वैदयकीय उपकरणे व औषधे यांचे किट देण्यात आले होते. पथकामार्फत तपासणी केल्यानंतर विदयार्थ्यांना संदर्भसेवा ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालये येथे दिल्या जाणार आहेत. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला कॉलेजचे पर्यवेक्षक पोपट केदार यांच्यासह प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.