उद्या सांगोला बंदची हाक! भव्य जनआक्रोश मोर्चा

सांगोला तालुक्यातील महूद येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांचा खून अतिशय निर्घृणपणे करण्यात आला. महूद गावातील गावगुंड यांनी कांबळे यांना मारून दहशत माजवली आहे. या खूनाचा मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली पाहिजे यासाठी मातंग समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांच्या कुणाच्या निषेधार्थ सांगोला येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाज भवन येथे नुकतीच सकल मातंग समाजाच्या वतीने आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी चिंतन बैठक बोलावली होती.

यावेळी सांगोला तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे. यामध्ये उद्या 19 जुलै म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी सांगोला बंदची हाक देण्यात आली असून तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

हा जनआक्रोश मोर्चा उद्या सकाळी दहा वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साठेनगर येथून महात्मा फुले चौकापासून तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे या जनआक्रोश मोर्चात तालुक्यातील सर्व सकल मातंग समाजातील समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.