जनतेच्या आशीर्वादावरच माझा विजय निश्चित – दिपकआबा साळुंखे पाटील

महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ हटकर मंगेवाडी, जुजारपूर, गुणापाचीवाडी, बलवडी येथे गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मतदारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होते. आतापर्यंत तालुक्याने आमदार निवडून दिले, पण राज्यात विरोधी पक्षाचे सरकार आले, त्यामुळे विकासाची गती कमी झाली. देशाचे शरदचंद्र पवार आणि जिल्ह्याचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आदेशानुसार गणपतराव देशमुख यांना विधानसभा निवडणुकीत मदत करून निवडून आणले.

टेंभूच्या पाण्यासाठी भीक मागावी लागणार नाही यासाठी पाणी वाटपाची शिस्त लावणार आहे. सोन्यासारख्या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी पुणे, मुंबईला जावे लागते, हे तालुक्याचे दुर्दैव आहे. यासाठी पाच एमआयडीसी आणून हजारो तरुणांच्या हाताला काम देवून त्यांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावणार आहे. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. आजही नागरिकांना मूलभूत गरजांसाठी पायपीट करावी लागत आहे, ही तालुक्याची शोकांतिका आहे.

गावभेट दौऱ्यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी तुम्ही निवडणुकीत उभा राहा असे सांगितले असून जनतेच्या आशीर्वादावरच माझा विजय निश्चित असल्याचे मत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी.झपके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, विजयदादा येलपले, चंद्रकांत चौगुले, रणजित बागल, जयवंत नागणे, चंचल बनसोडे, संभाजी पाटील, मारुती भुसनर, शिवाजी भुसनर, सुनील खांडेकर, सागर भुसनर, अर्जुन भुसनर, परमेश्वर व्हरगर, नितीन भुसनर, तानाजी भुसनर, गोविंद भुसनर, पूनम खांडेकर, नितीन व्हरगर, सुनील खांडेकर, नारायण माळी,

राम बाबर, विजय बजबळे, शहाजी हातेकर, माजी सरपंच संदीपान हिप्परकर, माजी चेअरमन भानुदास हिप्परकर, नारायण बजबळे, मेजर शिवाजीआण्णा करांडे, हनुमंत हिप्परकर, मनोज घाडगे, दादा माने, श्रावण हिप्परकर, विलास होनमाने, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन माने, मायाप्पा वाघमोडे, अर्चना कारंडे,अवि देशमुख, मोहसीन तांबोळी, समाधान शिंदे, संभाजी हरीहर, योगेश वलेकर, संजय गाडे, बाळासाहेब शिंदे, विनायक मिसाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.