इचलकरंजीत लाडकी बहिण योजनेचे अर्ज स्वीकारण्याची सुविधा ३१ ठिकाणी उपलब्ध

इचलकरंजी शहरातील विविध ३१ ठिकाणी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचे अर्ज शहरात स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.

त्यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त प्रसाद काटकर आणि स्मृती पाटील यांच्या नियंत्रणाखाली इचलकरंजी महापालिका क्षेत्रात या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे.

यासाठी पहिल्या टप्प्यात श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे दोन दिवसांचे विशेष शिबीराचे आयोजन केले होते. आता दुस-या टप्प्यात महापालिका मुख्य कार्यालय, ४ विभागीय कार्यालयासह शहरातील विविध ठिकाणी या योजनेचे अर्ज स्विकारण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध केली आहे.