नूतन आमदार सुहास भैय्यांचा आता वरिष्ठ पातळीवर दबदबा……

महायुतीचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. महाराष्ट्र राज्याचे नव्याने उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई येथे यांची सुहास भैया बाबर यांनी सदिच्छा भेट घेऊन मतदार संघातील विकास कामाबाबत चर्चा केली. यावेळी अजित दादांनी देखील स्वर्गीय अनिल भाऊंच्या आठवणींना उजाळा देत विक्रमी मताधिक्याने निवडून आल्याबद्दल सुहासभैया बाबर यांचे कौतुक देखील केले. एकूणच खानापूर मतदारसंघानंतर सुहास भैया बाबर यांचा वरिष्ठ पातळीवर दबदबा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.