Indian Post GDS Recruitment 2024 : दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Indian Post GDS Recruitment 2024) देशातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभाग अंतर्गत ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या एकूण 44,228 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे 10 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या उमेदवारांसाठी भरतीची मोठी संधी असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर.

संस्था – भारतीय टपाल विभाग

भरले जाणारे पद – ग्रामीण डाक सेवक

पद संख्या – 44,228 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024

वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. 3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. 4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/