विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः प्रत्येक मतदार संघाचा आढावा आज पासून घेत आहेत. राज्यभरातील विधानसभा मतदारसंघ अनुषंगाने पक्षातील नेत्यांची नियुक्ती निरीक्षक पदी करण्यात आली होती.
या निरीक्षकांनी महिन्याभरात प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेऊन, राज ठाकरे यांना आज अहवालात सादर करत आहेत यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणत्या जिल्ह्यात दौरा करायचा आणि कशाप्रकारे पुढे रणनीती असेल त्या संदर्भात निर्णय घेतील.