सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत चालल्याने महापालिका प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पूर पट्ट्यात पहिल्यांदा बाधित होणाऱ्या भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह महापालिकेच्या टीमकडून सांगलीतील जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट आदी परिसरात जाऊन तेथील नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या. पाण्याची पातळी अचानक वाढली तर कोणतीही जीवितहानी होऊ नये, याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. तसेच पाणीपातळी वाढली तरी महापालिकेच्या तात्पुरता निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावे, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी केले.
Related Posts
पलुस आणि कडेगांव तालुक्यातील ९४ घरकुलाना शासनाकडून मंजुरी!
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत पलुस कडेगांव तालुक्यातील सुमारे ९४ घरकुलना मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख…
जयंत पाटील यांचा विशाल पाटलांना टोला….
जिल्ह्यात एकास एक लढत झाल्यास भाजपचा (BJP) पराभव शक्य आहे. ‘सांगली’बाबतचा (Sangli Lok Sabha) वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असल्याने आता…
लोकल रेल्वे गाड्यांचा लाभ प्रवाशांना होणार…
सांगली स्टेशनवरून मुंबईप्रमाणेच लोकल रेल्वे गाड्यांचा लाभ प्रवाशांना होणार आहे. सांगली ते मिरज, आरग व पुढील गावांना जाताना बसपेक्षा कमी…