विश्वजित कदमांना बढती…..

देशभर लोकसभा निवडणुकीचा माहौल तयार झाल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भाजपला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्न करीत असताना काँग्रेसही मोर्चेबांधणीत व्यस्त आहे.पक्षाकडून प्रत्येक राज्यासाठी स्क्रीनिंग समिती बनवली जात आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीने लोकसभा निवडणुकीसाठी सहा राज्यांच्या स्क्रीनिंग कमिटी सदस्यपदी आमदार डॉ. विश्वजित कदम यांची नियुक्ती केली आहे. सांगली लोकसभेची आमदार कदम यांच्यावर जबाबदारी असताना अन्य सहा राज्यांची जबाबदारी देऊन त्यांना बढती दिल्याचे मानले जात आहे.लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे.

भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांची इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. काँग्रेसनेही भाजपला टक्कर देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत संघटन करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी गतवर्षी काढलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी झाली होती.