पत्नीला मित्रासोबत नको त्या अवस्थेत पकडूनही त्यानं माफ केलं, पण तिनं हद्दच केली!

गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे. पती-पत्नीमधील वाद आणि त्यातून होणारा गुन्हा याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नोएडा येथे एक भयानक हत्याकांड घडले आहे. अनैतिक संबंधातूनच हा गुन्हा घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे. 

नोएडातील सेक्टर 40 परिसरातील जनता फ्लॅटमध्ये सुपरवायजर शशि शर्मा याचा मृतदेह सापडला होता. आरोपींनी भाजी कापण्याचा सुरा वापरुन त्याचा गळा चिरला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशि शर्मा आणि मुख्य आरोपी भरत चौहान हे एकाच ठिकाणी ठेकेदार म्हणून काम करत होते. दोघांचेही एकमेकांच्या घरी येणेजाणे होते. भरतीची पत्नी सीमाने जवळच चहाची टपरी टाकली होती. पहिले शशी देखील तिथेच राहत होता. 

शशी आणि सीमा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांना नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर भरत संतापला होता. पण तरीदेखील पत्नीला एक संधी देत त्याने तिला माफ केले. त्या घटनेनंतर शशीने देखील घर बदलले आणि सेक्टर 40 मध्ये राहण्यासाठी आला. काही दिवसांपूर्वीच भरतने शशी आणि सीमामध्ये झालेल्या बोलण्याची कॉल रेकॉर्डिंग ऐकली. त्यानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तो पत्नी सीमा व आणखी एका मित्राला घेऊन शशीच्या घरी गेला. 

भरत शशीसोबत बोलत असताना दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर रागाच्या भरात शशीने सीमाच्या कानशीलात लगावली. यामुळं भरत आणि त्याचा मित्र राजा नाराज झाले आणि रागाच्या भरात भाजी कापण्याच्या चाकुने त्याने शशीच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यातच त्याचा जीव गेला आणि घटनास्थळावरुन ते तिघेही फरार झाले. 

शशी शर्मा हत्याकांडात सामील असलेला तिसरा युवकाचे नाव राजा तिवारी असं आहे. राजा बीटेकचा विद्यार्थी आहे. तो महर्षी विश्वविद्यालयात मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे. तो नेहमी भरत आणि सीमाच्या दुकानात चहा पिण्यासाठी येत असे. तिथेच भरत आणि राजाची मैत्री झाली. या मैत्रीखातरच तो भरत आणि त्याची पत्नी सीमासोबत शशीच्या घरी गेला होता. दरम्यान पोलिसांनी हत्येत सहकार्य केल्याच्या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली आहे. 

अनैतिक संबंधातून सुपरवायजर शशी शर्माची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी काही तासांतच या हत्येचा खुलासा केला आहे. एका महिलेसह तिघांना आरोप करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती नोएडाचे डीसीपी हरीश चंदर यांनी म्हटलं आहे.