हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथील पतीने सुरीने हल्ला केल्याने सीमा सूर्यकांत कांरडे वय ३२, रा. सध्या नवेपारगाव या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अक्षय दिलीप शिंदे यानी वडगाव पोलिसांत फिर्यादी दिली आहे. पती सूर्यकांत रतन कांरडे वय ४१ , रा. पट्टणकोडोली याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
वडगांव पोलिसातून मिळालेले माहिती अशी, नवे पारगाव येथील सीमा शिंदे यांचा पट्टणकोडोली येथील सूर्यकांत रतन कारंडे यांच्याशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला. कारंडे पती-पत्नीत वारंवार वाद होत असल्याने सीमा या नवे पारगावमध्येच माहेरगावी मुलांसमवेत विभक्त राहतात. पती सूर्यकांत हा वारंवार पारगावला येऊन पत्नीला त्रास देत असे. शुक्रवारी ७ तारखेला तो नवे पारगावला आला. त्याने शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास स्वयंपाक घरातील सुरी आणून पत्नी सीमावर जिवे ठार मारण्याच्या हेतूने सुरीने हल्ला केला.