मंगळवेढ्यात पोलीस निरीक्षक याचा पहिली धडकेबाज कारवाई….

मगळवेढा शहरात मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येताच नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी चोरीच्या तपासासाठी डी.बी.पथक तयार करुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता .यामध्ये डी. बी. पथकाला १ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या जुन्या वापरत्या ३ मोटर सायकली शोध घेण्यात यश आले आहे.मंगळवेढा शहरात भर दिवसा मोटर सायकली गायब झाल्याच्या तक्रारी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीसांचे डी.बी. पथक नेमण्यात आले असून यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे,

पोलीस अंमलदार महेश पोरे, वैभव घायाळ, सुरज देशमुख, कृष्णा जाधव यांनी तांत्रीक विश्लेषणाव्दारे तपास करुन गोपनीय माहितीच्या आधारे ३ मोटर सायकली चोरीचे गुन्हे उघड करण्यात त्यांना यश आले आहे.दरम्यान आरोपी सिध्देश्वर मारुती कदम (रा. मुढवी) याच्याकडे चोरीच्या मोटर सायकली असल्याची माहिती मिळताच सदर आरोपीस ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता ३ मोटर सायकली मिळून आल्या.

यामध्ये फौजदार चावडी सोलापूर शहर हद्दीमधील एम. १३ ए.आर.५४१४ ही ३० हजार रुपये किंमतीची, एम.एच.१३ सी.एम. ९१०१ ४५ हजार रुपये किंमतीची, एम.एच.१३ बी.ए.९५५९ ३० हजार रुपये किंमतीची .मंगळवेढा शहरातील दोन असा एकूण १ लाख ५ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरपदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,
डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी ही विशेष कामगिरी बजावली आहे.