उजनी धरण शून्य पातळी ओलांडून प्लसमध्ये येण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु आहे. पुण्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जोरदार पाऊस हा सोलापूर जिल्ह्यासाठी चांगला मानला जातोय.कारण पुणे जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत असतो. सध्या पुण्यात जोरदार पाऊस सुरु असून, उजनीत सकाळपासून 47000 क्यूसेक विसर्गाने पाणी येत आहे.

थोड्या वेळात हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. तसेच पारगावमध्ये देखील 68000 क्युसेक विसर्गणे पाणी येत आहे. पुण्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने वरच्या धरणातूनही पाणी सोडणे सुरू झाले आहे.उजनी धरणात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळं पाणीपातळी वाढली आहे. धरणात 53 टीएमसी जिवंत पाणीसाठा आहे. सध्या उजनी धरणात वजा 14 टक्के एवढे पाणी आहे. सध्याची स्थिती पाहता उद्या संध्यकाळपर्यंत धरण शून्य पातळी ओलांडून प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे.