आमदार प्रणिती शिंदेंचा अधिवेशनात घुमला आवाज!

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदेंनी बुधवारी विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरत जोरदार बॅटींग केली. सोलापूर जिल्ह्यातील त्या एकमेव विरोधी आमदार आहेत.अर्थसंकल्पावर चर्चा करताना आमदार प्रणितींनी सोलापूर महापालिकेंतर्गत पंप ऑपरेटर व मजूर विविध पंप हाऊसवर काम करीत आहेत. पण, ठेकेदार कामगारांच्या पगारात कपात करून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे.

त्या कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून पगार मिळावा व ठेकेदारांचा मक्ता रद्द करावा. तसेच मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही.

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मंगळवेढ्याचा आमदार भाजपचा करा, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजूरी आणि केंद्रातून पैसे उपलब्ध करतो’ असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप त्याची पूर्तता झाली नाही. सोलापुरात अधिकाऱ्यांचा मनमानी सुरू आहे. नियोजनाअभावी शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, असे मुद्दे मांडले.