मंगळवेढ्यातील शिवप्रेमी चौकातील आठवडा बाजारात लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा बसविण्याची प्रतीक्षा आता अल्पावधीतच संपणार आहे असा ठराव पुतळा बसविणे व जमा झालेल्या देणगीच्या हिशोबा संदर्भात शिवालयात बोलविण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.गतवर्षी शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा मंगळवेढ्यात येऊनही काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणी आल्यामुळे नियोजित जागेत पुतळा बसविता आला नाही.
यावेळी अजित जगताप म्हणाले की, पुतळ्या संदर्भातील सर्व गोष्टींची पूर्तता झालेली आहे पुतळा बसवूनच पुतळ्याचे फिनिशिंग तसेच चबुतऱ्याच्या बाजूचे कंपाउंड व सुशोभिकरण करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व पक्षाचे नेते,पदाधिकारी, शिवप्रेमीच्या उपस्थितीत सदर पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे असे सांगितले.
यावेळी शशिकांत चव्हाण यांनी पुतळा बसविताना काही अडचण आल्यास लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण सर्वजण प्रयत्न करू असे सांगून सर्व देणगीदारांचे व पुतळा उभा करण्यासाठी ज्यांनी वेळ देऊन प्रयत्न केले त्यांचे आभार मानले.
तर राहुल सावंजी यांनी जमा झालेल्या देणगीचा हिशोब यावेळी सादर केला सदर बैठकीमुळे मंगळवेढेकरांना पुतळा कधी बसणार? या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळणार असून सर्वांचे स्वप्न साकार होणार आहे.यावेळी बाबूभाई मकानदार,बाळकृष्ण जगताप,सुहास ताड यांचेसह मयत झालेल्या अन्य देणगीदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली.