निरा उजवा कालव्याचे पाणी सांगोल्यात दाखल…

दुष्काळी तालुका म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच अन्य पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर स्वरूपाचा आहे. वीर देवधर आणि भाटघर धरणाच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा प्रचंड वेगाने वाढत होता आणि धरणातील अतिरिक्त पाणी निरा नदीतून समुद्राला सोडण्यापेक्षा सांगोला विधानसभा मतदारसंघातील तिसंगी आणि चिंचोली तलावात सोडावे अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांच्याकडे केली होती.

माजी आमदार दिपकआबांच्या मागणीची त्वरित दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने नीरेचे पाणी उजव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने तिसंगी तलावात सोडले आहे लवकरच तिथं तलाव भरल्यानंतर हे पाणी सांगोला तालुक्यातील चिंचोली तलावात सोडण्यात यावे असेही यावेळी माजी आमदार दिपकआबांनी नमूद केले होते.

दरम्यान उन्हाळी आवर्तनात चिंचोली आणि तिसंगी तलाव पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. उजव्या कालव्याला आणि सांगोला शाखा कालव्याला पूर्णपणे पाणी मिळाले नव्हते. निरा उजवा कालव्याचे अतिरिक्त पाणी सध्या लाभक्षेत्राला आणि तिसंगीसह चिंचोली तलावाला मिळणार असल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.