कोल्हापूरसाठी हायकोर्ट एक्सप्रेस सुरु करा

कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उदघाटन नुकतेच झाले. सोलापूर जिल्हातील सर्वच पक्षकार वेगवान प्रवासाची गरज लक्षात घेता शहिद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने इंटरसिटी रेल्वे सुरु करावी, अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या मागणीमध्ये सोलापुरातून पहाटे ५ वाजता सोलापूर -कोल्हापूर- सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस सुरु करण्यात यावी. कोल्हापूर येथील सर्किट बेंचमध्ये किमान दररोज १ हजार ५०० वकील, पक्षकार जिल्ह्यातून ये-जा करतील असा आजाद आहे. सोलापुरातून या उच्च न्यायालयीन कामकाजाकरिता सोलापूर जिल्ह्यातील पक्षकार व वकील यांची कोल्हापूर येथे आवक -जावक वाढणार आहे. न्यायालयीन कामकाज असल्याने पहाटे सत्रात ही रेल्वे सोलापुरातून कोल्हापूर एक्सप्रेस सुरु करण्यात यावी व धाराशिव -कोल्हापूर – धाराशिव रेल्वे सुरु करण्यात यावी , अशी मागणी अशोक कामटे संघटनेने केली आहे.