आष्ट्यामध्ये पावसामुळे घराच्या भिंती पडल्या….

सध्या सगळीकडेच पाऊस सुरू आहे अशातच पूर परिस्थिती देखील अनेक भागांमध्ये निर्माण झालेली आहे. आष्टा येथील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या गणपती मंदिराजवळील परीट गल्ली येथील बाळासाहेब मारुती परीट व अविनाश बाबुराव परीट यांच्या घराची भिंत ही काल म्हणजेच शुक्रवारी पहाटे पावसामुळे पडल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान देखील झालेले आहे.

तसेच काकासो शिंदे हाऊसिंग सोसायटी मधील युवराज धोंडीराम मंडले यांच्या घराची ही भिंत कोसळली. मागील १५ ते २० दिवसांपासून आष्टा परिसरा संततधार पाऊस सुरूच आहे. सुदैवाने ही भिंत आतील बाजूला न पडता बाहेरील बाजूला पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र संसारपयोगी साहित्याचे मात्र मोठे नुकसान झालेले आहे.