हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीतून दोघेजण बाहेर! काँग्रेस अन् भाजपात लढत…

हातकणंगले नगरपंचायतीत दोघांचं नगराध्यक्ष होण्याचं स्वप्न भंगले आहे. जात पडताळणीचा अर्ज अवैध धरल्याने दोघांचे अर्ज बाद करण्यात आले. नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांच्या निधनानंतर या पदासाठी बिनविरोध निवड करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण भाजपनं नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उतरविला. नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी छानणीत संजय चौगुले व रामदास पांडव या दोघांचा अर्ज बाद करण्यात आले आहेत. छानणीत अखेर एकूण पाच जणांचे सहा अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यात काँग्रेसतर्फे अर्चना अरुणकुमार जानवेकर तर भारतीय जनता पार्टीकडून उज्वला विजय कांबळे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. आजपासून 31 तारखेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.

एकाहून अधिक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्न फसला. शेवटच्या क्षणापर्यंत स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडली होती. त्यादृष्टिकोनातून हालचाली झाल्या होत्या. मात्र, शेवटच्या दिवशी या सर्व भूमिकेला बगल देत आठ अर्ज दाखल झाल्याने राजकीय समीकरणे आणि दिलेल्या वचनांबाबत उलट सुलट चर्चा हातकणंगले नगरपंचायतीत सुरू आहेत.