सांगोला विधानसभेची मतमोजणीची तयारी पूर्ण! यावेळी होणार मतमोजणी सुरू

विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या, शनिवारी २३ तारखेला जाहीर होणार आहे. 253 सांगोला विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. सदरची मतमोजणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन सांगोला येथे होणार असून मतमोजणीसाठी 100 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी दिली. मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली असून एकूण 23 फेर्‍या होणार असून त्यासाठी 14 टेबल ठेवण्यात आले आहेत.

मतमोजणी सुलभ होण्यासाठी विविध अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदार्‍या सोपविण्यात आलेल्या आहेत संपूर्ण मतमोजणी साठी नियंत्रण अधिकारी, स्लिप मोजण्यासाठी अधिकारी, स्ट्राँग रूमसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे आणि 9 कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत सिलिंग टीम , भोजन व्यवस्था, हजेरी घेणे, स्क्रीन डिस्प्ले, व्हिडिओ चित्रीकरण, रिपोर्टिंग साठी ,आणि मीडिया साठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी दिली.