मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची पात्र यादी जाहीर झाली आहे. एक कोटी एक्याऐंशी हजार महिलांचे अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. या योजनेअंतर्गत पहिला हप्ता कधी येणार आणि पात्र महिलांची यादी कुठे पाहता येणार याबद्दलची खाली दिले आहे, ते वाचून घ्या.
महिला सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अर्जाची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
पात्र महिलांची यादी दर शनिवारी ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीत पाहता येईल. यादी लवकरच प्रकाशित केली जाणार आहे. त्या अदोगर तुमचा फॉर्म approved झाला की नाही पहा.
माझी लाडकी बहिण योजना पहिला हप्ता वितरणपात्र महिलांच्या खात्यावर 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीमध्ये पहिला हप्ता म्हणून 3000 रुपये वितरित होणार आहेत.