सध्या पावसाची रिपरिप सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. अशातच हातकलंगले तालुक्यातील रेल्वे लाईन जवळ असलेल्या मोरे कॉलनीमध्ये घरात पाणी शिरले आहे. काही दिवसापूर्वी या कॉलनीमधील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते.
तत्पूर्वी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूला गटर बांधणे आवश्यक होते तर तसे न करता घाई गडबडीमध्ये रस्ता करून निधी संपला. रस्ता उंचावर झाल्यामुळे पाणी घरात शिरत आहे आणि त्याचा पश्चाताप करण्याची वेळ आता मोरे कॉलनीतील कुटुंबावर आलेली आहे.
हातकणंगले ग्रामपंचायतीने चुकीच्या पद्धतीने रस्ते केल्याने मोरे कॉलनीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे त्यामुळे शहरवासीयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मोटर पंप लावून पाणी उपसा करण्याची मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे.