सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथील अजित जगन्नाथ वाळके वय ३२ याने काल शनिवार दि.२७ रोजी राहते घरी दुपारी नायलॉनच्या दोरीने खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. अजित यास दारूचे व्यसन होते ते सुटण्यासाठी त्याला सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते त्यानंतर त्यांनी गेल्या तीन आठवड्यापासून पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी केली. डॉक्टरांनी दारू पिण्यास मनाई केली होती.
त्यांनी पुन्हा दारू पिल्यामुळे अंग थरथर कापत होते व वेड्यासारखा तो बडबडत होता. त्याला २८ जुलै रोजी दवाखान्यात नेण्याचा घरच्यांचा विचार होता याबद्दल चर्चा सुरू असतानाच त्याने शेजारच्या खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली शेजारच्या खोलीत जाऊन पाहिले असता त्याने आत्महत्या केलेले दिसले.
हे पाहून त्यांच्या पत्नी जयश्री जोराने ओरडू लागल्या म्हणून वडील जगन्नाथ वाळके यांनी खोलीत जाऊन पाहिले असता अजित याने गळफास घेतलेले दिसले जगन्नाथ वाळके ( रा. मेडशिंगी ता. सांगोला) यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे. यामध्ये त्यांना त्यांची कोणाबद्दलही तक्रार नसल्याचे म्हटले असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.