सध्या लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहे. विधानसभा निवडणुकी अगोदरच अनेक कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी आपली इच्छा व्यक्त करून मोर्चेबांधणी सुरुवात केलेली आहे. महाडिक गटातील बहुतांशी कार्यकर्त्यांनी आगामी पालिका निवडणूक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी दर्शवली आहे. याला माजी नगरसेवक सतीश महाडिक यांनी देखील दुजोरा दिलेला आहे.
महाडिक गटाचे आर्थिक आणि दानशूर असे उगमस्थान असलेले नेतृत्व कपिल ओसवाल यांनी आपला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला. शहरातील मुख्य चौकातून आजही त्यांचे डिजिटल पोस्टर जळकत आहेत. बहुतांशी पोस्टर्सवर भावी नगराध्यक्ष म्हणून ही उल्लेख केला आहे. महाडिक गटाचे बहुतांशी कार्यकर्ते आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहे. त्यामुळे इस्लामपूर येथे कार्यकर्त्यांची वर्दळ वाढलेली आहे. येणारी पालिका निवडणूक महाडिक गट स्वतंत्रपणे लढवणार आहे. जेणेकरून पालिकेच्या राजकारणात बहुतांशी कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे. राहुल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पालिका निवडणूक लढविण्यासाठी शहरात इच्छुकांची संख्या देखील वाढू लागली आहे.