इचलकरंजी शहराला मिळणार दोन आमदार…..

सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मोर्चे बांधणी करताना दिसत आहे. तसेच अनेक पक्षात उमेदवारीवरून तोडजोड देखील सुरू झालेली आहे.इचलकरंजी शहरातील विद्यमान आमदार प्रकाश आवाडे हे भाजपाचे सहयोगी सदस्य आहेत तर सुरेशराव हाळवणकर हे भाजपाचे माजी आमदार व राज्य कार्यकारिणीचे काम प्रभावीपणे पार पाडत आहेत.

त्यामुळे भाजप नेतृत्वासमोर इचलकरंजीच्या उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे इचलकरंजीचा तिढा सोडवण्यासाठी, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांची विधानसभेची लाईन क्लिअर करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या यादीत स्थान दिल्याचे सूत्राकडून माहिती समजते.त्यामुळे आता इचलकरंजीच्या विधानसभेचा तिढा सुटणार आहे.

भाजपाचे सहयोगी सदस्य असलेल्या प्रकाश आवाडे यांचाही विधानसभेचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे भविष्यात इचलकरंजी शहराला दोन आमदार मिळणार असल्याने भाजपसह ताराराणी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होणार आहे.