सध्या पावसाचा जोर जरी कमी आला असला तरीही पूर परिस्थिती अजूनही आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात आलेले आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री आ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी पंचगंगा व वारणा नदीकाठच्या घुणकी ,हालोंडी व रुई गावातील पूरबाधित स्थलांतरित कुटुंबांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
तसेच त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या जाणून देखील घेण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी कायमस्वरूपी स्थलांतर करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी आ. विनय कोरे यांनी पूर ओसरल्यानंतर शासन दरबारी प्रयत्न करण्याचे अभिवचन देखील पूरबाधितांना दिलेल.