इस्लामपुरात एक ऑगस्टपासून सौदे होणार दुपारी…

इस्लामपूरच्या भाजीपाला बाजारात आटपाडी, कडेगाव, पलूस शिराळा आणि स्थानिक गावांमधून मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक होते. तसेच कोकण आणि गोवा राज्यात येथून भाजीपाला जात असतो. इस्लामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारातील कुसुमताई पाटील मार्केटमधील भाजीपाल्यांचे सौदे हे एक ऑगस्टपासून दररोज दुपारी एक वाजता होणार आहेत याची माहिती सभापती संदीप संपतराव पाटील यांनी दिलेली आहे.

यापूर्वी हे सौदे पहाटे पाच वाजता होत असत यामुळे शेतकऱ्यांची वाहतूक आणि इतर बाबींमध्ये गैरसोय होत होती. त्यामुळेच हे भाजीपाला सौदे दुपारी सुरू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीवरच बाजार समिती प्रशासन व भाजीपाला अडत्यांची बैठक घेऊन एक ऑगस्टपासून भाजीपाला सौदे हे दुपारी घेण्याचा निर्णय झालेला आहे.