गॅस भरण्यासाठी आलेल्या तीन चाकी टेम्पोतून धूर! मोठा अनर्थ टळला

कोल्हापुर रत्नागिरी मार्गावर वाघबीळ घाटामध्ये दीपराज पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर गॅस भरण्यासाठी वाहनांची नेहमीच गर्दी असते. या ठिकाणी पडवळवाडी येथील या ठिकाणी पडवळवाडी येथील छोटा हत्ती टेम्पो गॅस भरण्यासाठी आलेला होता अचानक गाडीच्या खालून धूर येऊ लागला. पण चालकाला त्याची कल्पना नव्हती. त्याचवेळी शाहूवाडी निर्भया पथकातील पोलीस हवालदार संजय पवार यांनी गाडीखालून येणारा धूर पाहिला आणि तात्काळ त्यांनी तो टेम्पो पंपाबाहेर घेण्यासाठी चालकाला सांगितलं.

त्यानंतर पंपा मधील अग्निशामक यंत्र घेऊन अन्य वाहन चालकांच्या मदतीने फवारणी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली यामुळे मोठा अनर्थ टळला. संपूर्ण पेट्रोल पंपाला आग लागली असती तर मोठा अनर्थ झाला असता परंतु हा अनर्थ संजय पवार यांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली.