बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत महत्वाची अपडेट !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. आता या परीक्षांच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विद्यार्थी गेल्या कित्येक दिवसांपासून निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

काही दिवसांपूर्वीच बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून खुलासा करण्यात आला की, मेच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहिर केले जाऊ शकतात. मध्यंतरी चर्चा होती की, दहावी आणि बारावीचा निकाल मेच्या दुसऱ्या आठवड्यात जाहिर केला जाईल.

आता नुकताच बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आलंय.रिपोर्टनुसार दहावीच्या निकालाच्या अगोदर बारावीचा निकाल हा जाहिर केला जाईल आणि याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल जाहीर होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अजून निकालाबद्दल कोणतेच अपडेट देण्यात नाही आले.

mahresult.nic.in, mahahsscboard.in, hsc.mahresults.org.in,

hscresult.mkcl.org, results.gov.in.

या साईटवर जाऊन आपण बारावीचा निकाल पाहू शकता. यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे. यंदाच्या बारावीच्या निकालात मुले बाजी मारतात की मुली बाजी मारतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.