हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. गावातील काही तरुण विना नंबरप्लेट असणाऱ्या गाड्या मोठ्याप्रमाणात फिरवताना दिसत आहेत, अशातच मोटारसायकलमधील सायलेंसर मधील पुंगळ्या काढून कर्णकर्कश आवाजात गावातील मुख्यरस्त्यासह गल्लीबोळातून मोटारसायकल फिरवत आहेत. गाड्यांच्या पुंगळ्या काढल्याने होणारा आवाज इतका भयानक आहे की लहान मुलांसह वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अचानकपणे गाड्यांचा कर्णकर्कश आणि मनात धडकी भरवणाऱ्या आवाजाने लोक चांगलेच भयभीत होत आहेत. कर्णकर्कश आवाजासह ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मोटरसायकल स्वारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. आता यावर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे उचित ठरेल.