सकल मराठा समाजाची बैठक संपन्न……

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे सात ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली होणार आहे.या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने करमाळा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.

यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. या शांतता रॅलीसाठी करमाळ्यातील मराठा बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आव्हान सोलापूर जिल्हा मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी केले.यावेळी माऊली पवार म्हणाले, सरकार जाणूनबुजून मराठा व इतर समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे.

परंतु आपला लढा हा कोणत्याही जातीच्या व धर्माचे विरोधात नसून आपल्याला आपल्या हक्काचे ५० टक्क्यांच्या आतून ओबीसी आरक्षण मिळवायचे आहे व आपल्या लेकरा-बाळांचे भवितव्य सुरक्षित करायचे आहे म्हणून सर्व मराठा समाज बांधवांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आव्हानही त्यांनी आहेत.